
निर्व्हाळचा ‘उत्सव’ आणि आजी
शाहीन इंदुलकर
१० डिसेंबर २०२२
चिपळूणहून गुहागरच्या दिशेने जाताना वाटेत आमच्या आजीचे माहेर लागतं. आजीच्या लहानपणी ’जाधव’ हे तिथले जमीनदार होते. पाच भाऊ आणि चार बहिणी असा मोठा परिवार. सगळ्यात मोठे भाऊ- कृष्णराव. त्यांना दोन मुली होत्या. कावेरी आणि द्वारकी. थोरली कावेरी हीच माझी आजी. पूर्वी कधीतरी गावातल्या बापट गुरुजींनी जाधव कुटुंबाला एक सल्ला दिला. तुमच्या जमिनीवर एक मारुतीचं देऊळ बांधा आणि जाधवांनी ते देऊळ बांधलं! पुढे पा…